नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. मंड्याला पोहचताच पंतप्रधान मोदींनी आपल्या रोड शोला सुरुवात केली. यानंतर पंतप्रधान बेंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेसवेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हा द्रुतगती मार्ग 118 किमी लांबीचा असून तो सुमारे 8,480 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींनी मंडयात रोड शो सुरू करताच नागरिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले. पीएम मोदींना पाहण्यासाठी नागरिकांनी चारही बाजूंनी गर्दी केली होती. यावेळी चहू बाजूंनी पंतप्रधानांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या गाडीवर देखील पुषवृष्टी झाली होती. यावेळेसचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत. कर्नाटकातील आगामी निवडणुकांच्या टृष्टीने मोदींचा हा दौरा अतिशय महत्वाचा असणार आहे.
पंतप्रधान त्यांच्या कर्नाटक दौऱ्यात 16,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही करतील. पंतप्रधान राज्यातील जनतेला अनेक नवीन प्रकल्प देखील भेट देतील. हंपीच्या धर्तीवर बांधलेल्या होसापेटे रेल्वे स्थानकाचेही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
#WATCH | PM Narendra Modi showered with flowers by BJP supporters and locals as he holds road show in Mandya, Karnataka
During his visit, PM will dedicate and lay foundation stone of projects worth around Rs. 16,000 crores
(Video source: DD) pic.twitter.com/K8hvPCgpRF
— ANI (@ANI) March 12, 2023
बंगलोर आणि म्हैसूर प्रवास होणार 75 मिनिटांत
एक्स्प्रेस वेच्या विकासामुळे, बेंगळुरू आणि म्हैसूर दरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे 3 तासांवरून 75 मिनिटांवर येईल.या प्रकल्पात NH-275 च्या बेंगळुरू-निदघट्टा-म्हैसूर विभागाच्या 6-लेनिंगची कल्पना आहे. हा द्रुतगती मार्ग दोन्ही शहरांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी महत्वाचा असणार आहे.