Vijay Shivtare । बारामती लोकसभा मतदार संघातून मोठी बातमी समोर आलीय. बारामती लोकसभा मतदारसंघात लढण्याची घोषणा करणारे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. शिवतारे यांनी आज सासवडमध्ये ही घोषणा केली.
दरम्यान, बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आज कार्यकर्त्यांशी चर्चा करून अखेर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली.
यावरून आता शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’बारामतीमध्ये जनता विरुद्ध अजितदादांनी घेतलेला निर्णय अशी लढत आहे. सागर बंगला काही गोष्टी देण्याचं केंद्र झालं आहे. आता भाजपाने कुटुंब आणि पक्ष फोडला आहे त्यामुळे लोक चिडले आहेत. भाजपाचे अनेक कार्यकर्ते अजितदादांचा प्रचार करणार नाहीत, ते ‘तुतारी’चा प्रचार करतील. त्यामुळे सुप्रिया सुळेंचं लीड अडिच लाख असणार आहे.’
ते पुढे म्हणाले,’शिवतारे जर असा यु-टर्न घेत असतील तर लोक त्यांना दुटप्पी भूमिका घेता अस म्हणतील, ते शांत झाले असले तर त्यांनी अजितदादांवर केलेल्या टीकेचे व्हिडीओ लोकांपर्यंत पोहोचले आहेत ते कसे डिलिट करणार.’ असा टोलाही आमदार रोहित पवार यांनी लगावला.
हे वाचलं का ? वायनाडमधील भाजपचे उमेदवार के. सुरेंद्रन यांच्यावर २४२ गुन्हे दाखल, राहुल गांधींविरोधात लढवणार ‘निवडणूक’