Satendra Jain Case । दिल्लीचे माजी मंत्री तसेच आप नेते सत्येंद्र जैन यांच्या अडचणीत वाढ झालीय. गृह मंत्रालयाने त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत सीबीआय चौकशीसाठी परवानगी दिलीय. सत्येंद्र जैन यांच्यावर गँगस्टर सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून “प्रोटेक्शन मनी” म्हणून 10 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे.
सत्येंद्र जैन आणि तिहार तुरुंगाचे माजी डीजी संदीप गोयल यांच्यावर तिहार तुरुंगात खंडणी रॅकेट चालवल्याचा आणि दिल्लीच्या विविध तुरुंगात बंद असलेल्या हायप्रोफाइल कैद्यांकडून संरक्षण रक्कम गोळा केल्याचा आरोप आहे. याशिवाय गँगस्टर सुकेश चंद्रशेखरने सत्येंद्र जैन आणि संदीप गोयलसह तिहार तुरुंगातील इतर अधिकारी राजकुमार आणि मुकेश प्रसाद यांच्यावर 2019-22 या वर्षात 12.50 कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप केला होता.
लेफ्टनंट गव्हर्नर यांच्याकडे तक्रार केली होती Satendra Jain Case ।
गँगस्टर सुकेश चंद्रशेखरने दिल्लीच्या एलजीकडे याबाबत तक्रारही केली होती. तिहार तुरुंगातील सत्येंद्र जैन आणि इतर अधिकाऱ्यांनी पैशाच्या बदल्यात आपल्या सरकारी पदाचा गैरवापर करून जेल मॅन्युअलच्या विरोधात तुरुंगात बंद कैद्यांना अनेक सुविधा दिल्याचा आरोप आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना तत्कालीन तुरुंग अधिकाऱ्यांनी केवळ व्हीआयपी ट्रिटमेंटच दिली नाही तर इतर कैद्यांना मसाजही दिला होता.
लेफ्टनंट गव्हर्नरांनी सीबीआय तपासाची शिफारस Satendra Jain Case ।
फेब्रुवारीमध्ये दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी या प्रकरणी सत्येंद्र जैन यांच्याविरोधात सीबीआय चौकशीची शिफारस गृह मंत्रालयाकडे केली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सीबीआयने नायब राज्यपालांना पत्र लिहून सत्येंद्र जैन हे तिहार तुरुंगातून खंडणीचे रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला होता. जैन यांनी गुंड सुकेशकडून संरक्षण मनी म्हणून १० कोटी रुपये मागितल्याचे सीबीआयने म्हटले आहे. सुकेशने 2018 ते 2021 दरम्यान सत्येंद्र जैन यांनी स्वतः किंवा त्याच्या सहकाऱ्यांमार्फत पैसे उकळल्याचा आरोप केला आहे.
सत्येंद्र जैन यांना मे 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. या वर्षी मार्चमध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांची शेवटची जामीन याचिका फेटाळली होती आणि त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. तेव्हापासून तो तिहार तुरुंगात बंद आहे.