Lok Sabha Election 2024 । भाजपने वायनाड लोकसभा मतदारसंघातून के. सुरेंद्रन यांना उमेदवारी दिली आहे. सध्याचे खासदार असलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना के. सुरेंद्रन येथे आव्हान देणार आहे. सुरेंद्रन हे केरळ भाजपचे अध्यक्षही आहेत.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेते के. सुरेंद्रन यांच्यावर 242 गुन्हे दाखल आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सुरेंद्रन यांनी अलीकडेच पक्षाच्या मुखपत्रात त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्हेगारी प्रकरणांचा तपशील प्रसिद्ध केला होता. तसेच भाजपचे एर्नाकुलमचे उमेदवार के. एस राधाकृष्णन यांच्यावर जवळपास 211 गुन्हे दाखल आहे.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस जॉर्ज कुरियन यांनी याबाबत एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ‘बहुतांश प्रकरणे 2018 मधील सबरीमाला आंदोलनाशी संबंधित आहे. बहुतांश प्रकरणे न्यायालयात आहे. जेव्हा पक्षाचे नेते संप किंवा आंदोलन पुकारतात तेव्हा पोलिस त्या संदर्भात गुन्हा दाखल करतात. निवडणूक आयोगाच्या नवीन नियमांनुसार, उमेदवारांना कोणत्याही वृत्तपत्रात किंवा मासिकात त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्हेगारी प्रकरणांचा तपशील प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे.’
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष यांनी शुक्रवारी ट्विट केले. ‘सुरेंद्रन, के. एस राधाकृष्णन यांनी पक्षाच्या अलाप्पुझा उमेदवार शोभा सुरेंद्रन आणि वाटकारा उमेदवार प्रफुल्ल कृष्णा यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या खटल्यांचा तपशील शेअर केला आणि लिहिले, ‘भारताच्या काही भागात राष्ट्रवादी होणे कठीण आहे. हा रोजचा संघर्ष आहे. केरळ भाजपचे अध्यक्ष जॉर्ज कुरियन यांच्या विरोधात नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या संख्येची माहिती देताना म्हणाले, ‘२३७ खटले सबरीमाला आंदोलनाशी संबंधित आहेत, तर ५ केरळमधील विविध आंदोलनांशी संबंधित आहेत.’
पठाणमथिट्टा जिल्ह्यातील टेकडीवरील सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या केरळ सरकारच्या निर्णयाविरोधात 2018 मध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी राज्यव्यापी निदर्शने केली होती.
अन्य पक्षांच्या उमेदवारांच्या प्रकरणांचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल आहे. 5 एप्रिल रोजी छाननी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल आहे.
हे वाचले का ? 1400 वर्षे जुना DNA सापडला, चिनी सम्राटाचा चेहरा तयार करण्यात ‘यश’