Archana Puran Singh| कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा त्याच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ शोमधून प्रेक्षकांना पुन्हा हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी कपिलचा शो टीव्हीवर नाही तर ओटीटीवर दिसणार आहे.. नुकताच या शोचा ट्रेलर रिलीज झाला. यावेळी शोची संपूर्ण स्टार कास्ट दिसली. या शोमध्ये सुनील ग्रोव्हरही पुनरागमन करत आहे. याआधी अर्चना पूरण सिंह जजच्या भूमिकेत होती. यावेळी देखील अर्चना कॉमेडी शोमध्ये जजच्या खुर्चीवर बसणार आहे.
अलीकडेच एका मुलाखतीत तिने सांगितले की, तिच्याकडे जगातील सर्वोत्तम काम आहे कारण तिथे तिला हसायचं असतं. अर्चनाला या शोमध्ये खराब विनोदांवर खोट्या हसण्यामुळे बरेचदा तिला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले. यावर आता एका मुलाखतीत तिने खुलासा केला आहे.
ती म्हणाली, ‘मला माहित नव्हते की एक दिवस मी माझ्या हसण्यामुळे इतकी प्रसिद्ध होईन. एक अभिनेत्री म्हणून मला नेहमी वाटायचं की माझा अभिनय प्रसिद्ध होईल, पण नियती तुम्हाला कुठे घेऊन जाईल हे कोणालाच माहित नसते.’
यावेळी अर्चना पूरण सिंहला वाईट विनोदांवरही का हसते? असा प्रश्न देखील विचारण्यात आला. तेव्हा तिने उत्तर दिले, ‘असे आता होत नाही. आता तुम्ही बघा, गेल्या तीन वर्षांपासून आम्ही शो करत आहोत, पूर्वी लोक म्हणायचे की मी वाईट विनोदांवरही हसायते, मला ते आवडायचे नाही. तेव्हा काय व्हायचे की एखाद्या जोकमध्ये पंच नसेल तर निर्मात्यांना वाटायचे की आपण अर्चनाचे हसू वापरले तर तो जोक्स दिसून येईल, पण ते कामी आले नाही.’
अर्चना म्हणाली, ‘बऱ्याच वेळा लोक मला विचारायचे की मी या जोकवर एवढ्या मोठ्याने कशी हसतेय, पण तो एडिट झाला. शोचे संपादक वाईट विनोदांवरही माझा हशा पिकवायचे, पण आता तसे होत नाही. पूर्वी शोमध्ये काम करणारे एडिटर प्रत्येक वेळी वाईट विनोद झाल्यावर माझे हसणे थांबायचे, परंतु आता हे बदलले आहे.”