मुंबई – सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात धमक्यांचं सत्र मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आज (दि. १३) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची बातमी समोर आली होती. मात्र, ही बातमी ताजी असतानाच आणखी एका राजकीय नेत्याला धमकीचा फोन आला असल्याचं समोर आलं आहे.
भाजपचे नेते, विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अनोळखी व्यक्तीने ही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. प्रसाद लाड यांचे पुतणे वरुण लाड यांच्या मोबाईलवर याबाबत मेसेज पाठविण्यात आला असून, धामिकचा फोन देखील करण्यात आला आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.
दरम्यान, धमकी देणाऱ्या व्यक्तीबद्दल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. कलम 507 अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस धिकारी या घटनेचा पुढील तपास करत आहेत. एकाच दिवसात राज्यातील दोन नेत्यांना जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली. मुंबईतील सिल्व्हर ओक येथील घरी अज्ञात व्यक्तीनं फोन करुन धमकी दिल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, शरद पवार अधिवेशनासाठी दिल्लीला गेले आहेत.
शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी पवारांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात गोंधळ उडाला आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील घरी एका अज्ञात व्यक्तिचा फोन आला. मुंबई देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन ठार मारणार असल्याचं धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तिनं फोनवर म्हटलं आहे.