पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रणरागिनी म्हणून परिचीत असलेल्या मनसे पुणे शहर उपाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पक्षात होत असलेल्या त्रासावर आपली भूमिका स्पष्ट केली. एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
राजकारणात स्त्रीला टार्गेट केलं जात. तेच आता मनसेत माझ्याबाबत घडू लागले आहे. मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनापासून काम करत आहे. पक्ष सोडण्याचा अजिबातच विचार नाही. पण मला या रिकामटेकड्या मंडळींचा वारंवार होणारा त्रास नवा पर्याय शोधण्यास भाग पाडू शकतो, असं रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं.
पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानं मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटील या आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी त्यांची चर्चा झाली आहे. जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या शुक्रवारी रुपाली पाटील या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.