मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच, देशातील लॉकडाऊन आणखी 19 दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे.
मोदींनी जनतेला आवाहन केल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील जनतेला सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे.
राज ठाकरे यांनी फेसबूकवर यांसंबंधी एक पोस्ट केली आहे. यामध्ये राज यांनी जनतेसाठी झटणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले असून काही महत्त्वाच्या सुचना केल्या आहेत. तर नागरिकांना राज ठाकरे यांनी या मेसेजमधून कळकळीची विनंतीदेखील केली आहे.
राज ठाकरे यांची फेसबूक पोस्ट