मुंबई : मुंबईतील धारावीमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा वाढत चालला आहे. मंगळवारी धारावीत कोरोनाचे आणखी ६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा ५५ वर पोहचला आहे. तर मंगळवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील मृतांचा आकडा ७ झाला आहे, मुंबई महानगरपालिकेने ही माहिती दिली आहे.
6 more #COVID19 positive cases & 2 more deaths related to the virus reported in Dharavi area of Mumbai. Total positive cases in the area now at 55 & related deaths at 7: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) #Maharashtra pic.twitter.com/qbzCWlYorG
— ANI (@ANI) April 14, 2020
धारावीतील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगर पालिका आणि राज्य सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. याठिकाणी डॉक्टरांचे पथक घरोघरी जाऊन प्रत्येकाची तपासणी करत आहे. तसेच कोरोनाचे रुग्ण आढळलेला परिसर सील करण्यात आला असून ड्रोनच्या माध्यमातून याठिकाणी नजर ठेवण्यात येत आहे.