नवी दिल्ली – काँग्रेस खासदार धीरज साहू यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्राप्तिकर विभागाने 350 कोटी रुपये जप्त केले होते. आता यासंदर्भात वर्षभरातील टॅक्समध्ये सुधारणा करत, त्यांनी 150 कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे.
डिसेंबर 2023 मध्ये, मागच्याच वर्षी धीरज साहूशी संबंधित असलेल्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. यामध्ये 351 कोटी रुपयांहून अधिक किमतीची रोख रक्कम आणि 2.8 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे बेहिशेबी दागिने जप्त करण्यात आले. कारवाई पूर्ण झाल्यानंतर विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, 329 कोटी रुपयांच्या रोख रकमेचा मोठा भाग ओडिशाच्या छोट्या शहरांमधून जप्त करण्यात आला. आता साहू यांनी 150 कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे.
साहू यांनी हा टॅक्स भरताना, असा दावा केला आहे की, काही रोख रक्कम चालू आर्थिक वर्षाच्या व्यवसायाशी संबंधित आहे, ज्याचे रिटर्न फक्त पुढील आर्थिक वर्षात भरायचे आहेत. उर्वरित 50 कोटींच्या रकमेबाबत कोणतीही ठोस माहिती नसल्याचे समोर येत आहे. यावर आता आयकर विभाग दंड आणि कर आकारणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रोख रक्कम बिझनेस टर्नओव्हरचा भाग आहे. एकूण जप्त रक्कम आणि दागिन्यांपैकी 50 कोटी रुपयांच्या रोख रकमेबाबत ते काहीही सांगू शकले नाहीत. त्या रकमेवर त्यांना कर आणि दंड भरावा लागेल. आयकर नियमांच्या अंतर्गत, मूळ टॅक्स रिटर्नमध्ये चुका किंवा गहाळ तपशील दुरूस्त करण्यासाठी रिटर्नमध्ये दुरूस्तीची परवानगी आहे.