मुंबई – बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या रिलेशनशिपची चर्चा रंगलेली असते. सध्या अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा यांच्या नात्याच्या तुफान चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दोघांनी सर्वांसमोर नात्याची कबुली दिली. अनेकदा या दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आले आहे. मात्र विजयला लाईमलाईटपासून दूर राहिले आवडते. याबाबत त्याने खंत व्यक्त केली आहे. या दोघांनी आपल्या नात्याबाबत कबुली दिल्यानंतर मिळणारी लाईमलाईट विजयला आवडत नाही.
एका मुलाखतीदरम्यान विजय म्हणाला, “मी पूर्वी एकटा फिरायचो आता माझ्यासोबत तमन्ना असते. आम्ही अनेक ठिकाणी एकत्र फिरतो. पण आता आम्हाला प्रचंड लाईमलाईट मिळते. परंतु मला या लाईमलाईटची, प्रसिद्धीची सवय नाही. मी यासाठी पूर्णपणे कम्फर्टेबल नाही, पण मी याची सवय करून घेण्याचा प्रयत्न करत आहे.” प्रोफेशनल आयुष्यापेक्षा लोकांना जास्त माझ्या खासगी आयुष्यात अधिक रस आहे. ही गोष्ट विजयला कायम खटकते असल्याचेही त्याने म्हंटले आहे.
दरम्यान, विजय आणि तमन्ना यांनी ‘लस्ट स्टोरिज 2’ सिनेमात एकत्र काम केले होते. या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांमध्ये प्रेम बहरले होते. त्यानंतर अनेकदा यांच्या रिलेशनशिपची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. या दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर चर्चा विषय झाला होता. अखेर एका मुलाखतीत तमन्नाने विजयसोबत असलेल्या नात्यावर मोठा खुलासा केला होता.