मुंबई – सिंगर मिका सिंग हा एक उत्तम गायक तर आहे. तो नेहमीच त्याच्या गाण्यांमुळे चर्चेत असतो पणयावेळी मित्राला महागडं गिफ्ट दिल्यामुळे तो चर्चेत आला आहे. आपल्या गाण्यांवर सर्वांना नाचायला लावणारा मिका सिंग आजकाल मैत्रीचे उदाहरण बनला आहे. अलीकडेच प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मिका सिंगने आपल्या मित्राला स्पेशल गिफ्ट फील आहे.
मिका सिंगने 4 कोटींचा फ्लॅट गिफ्ट केलाय. मिकाचा खास मित्र कंवलजीत सिंगचा नुकताच वाढदिवस होता, त्यानिमित्त मिकाने त्याला मुंबई आणि दिल्लीत करोडो रुपये किमतीचे दोन बंगले गिफ्ट केले होते. हे समजल्यानंतर सर्वजण मिकाच्या मैत्रीचे उदाहरण देत आहेत.
एकीकडे लोक गायकाचे खूप कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे काही लोक मिका सिंगच्या या भेटीला टॅक्स टाळण्याचा प्लॅन सांगत आहेत. लोक मिका सिंगवर कमेंट करत आहेत की, मिकाने टॅक्स टाळण्यासाठी मस्त प्लान बनवला आहे. मात्र, आत्तापर्यंत मिका सिंगच्या कमेंटला लोकांकडून प्रतिसाद मिळालेला नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिका सिंग एकूण 97 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. गायक जगभरातील लाइव्ह कॉन्सर्टमध्ये पार्श्वगायन करून प्रचंड पैसा कमावतात. त्याचबरोबर मिका टीव्हीवरील रिअॅलिटी शोमधूनही भरपूर कमाई करतो. एका गाण्यासाठी गायक 15 लाख रुपयांपर्यंत फी घेतात. त्यांचे एकल अल्बमही सुपरहिट ठरले. त्याचवेळी मिका पार्टी, लग्न आणि स्टेज प्रोग्रामसाठी 30 ते 50 लाख रुपये घेतो.