मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातही शाब्दिक चकमक दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. चित्रा वाघ यांनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली. त्यानंतर उर्फीनेही ट्वीट करत चित्रा वाघ यांचा सासू असा उल्लेख केला होता. या वादानंतर उर्फीचा पोलिसांनी जबाब नोंदवला होता. त्यानंतर तिने हिंदू धर्माच्या इतिहासाचा संदर्भ देत काही ट्विट करत चित्रा वाघ आणि भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता तिने शीख धर्माचा उल्लेख करत एक ट्विट केले आहे.
आता उर्फीने शीख धर्माबद्दल ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये उर्फीने “मी अजिबात धार्मिक व्यक्ती नाही पण मला गुरुद्वाराची संकल्पना खूप आवडते. लोकांना त्यांचा धर्म, जात, लिंग, रंग, श्रीमंती याची पर्वा न करता जेवायला देणं. शीख आजही अशा भक्तिभावाने लंगर चालवतात, कौतुकास्पद आहे, मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे,” असं उर्फीने तिच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
I’m not at all a religious person but I do like the concept of gurudwara . Feeding people irrespective of their religion , caste, gender , Color , wealth. Sikhs still carry out langars with such devotion which is commendable👏🏻 huge respect .
— Uorfi (@uorfi_) January 16, 2023
एवढेच नाही तर उर्फीने काही दिवसापूर्वी मुस्लीम धर्माबद्दल ट्वीट केले होते. “मुस्लीम पुरुषांना वाटतं की ते त्यांच्या पत्नीचे मालक आहेत,” असे ती म्हणाली होती.
These Muslim men think they own their women , https://t.co/2P2iUwYTtn
— Uorfi (@uorfi_) January 15, 2023
उर्फीच्या या ट्वीटवर नेटकरी संमिश्र प्रतिक्रियाही देत आहेत. ‘चांगली व्यक्ती बनण्यासाठी तुम्ही धर्म बदलण्याची गरज नाही’. ‘उर्फी तू अगदी खरं बोलत आहेस’, ‘शीख लोकांबद्दल खूप आदर आहे’, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. दरम्यान, चित्रा वाघ यांनी उर्फीवर कारवाई होणार नाही तोपर्यंत आपण बोलतच राहणार असल्याचे म्हटले आहे.