डिस्चार्ज मिळाल्यानंतर रजनीकांत यांचा राजकारणातील एन्ट्रीबाबत “मोठा निर्णय” म्हणाले …

नवी दिल्ली – तमिळ चित्रपटसृष्टीतील महानायक रजनीकांत यांनी आपण आपला स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती . 31 डिसेंबर रोजी ते या नव्या राजकीय पक्षाची अधिकृतपणे घोषणा करणार होते. मात्र  आता आरोग्याचे कारण सांगून राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे ‘थलैवा’ यांनी जाहीर केले आहे.

मिळलेल्या माहितीनुसार,एका पत्राद्वारे त्यांनी आपली भुमिका जाहीर केली आहे. ते म्हणाले की, “राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, मी जनतेसाठी इथून पुढेही काम करतच राहिन.”

रजनीकांत यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजकीय पक्ष सुरु करण्याचा विचार मागे घेतला आहे. रजनीकांत यांनी तीन पानांचं पत्र ट्विट करत ही घोषणा केली आहे. पक्ष स्थापन करत नसल्याबद्दल त्यांनी माफीदेखील मागितली आहे.

#फोटो : ‘थलैवा’ला मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज ; पत्नीने केले असे काही…

दरम्यान, पक्षस्थापनेच्या घोषणेच्या आधीच त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिटलमध्ये ऍटमिट करण्यात आलं होतं. उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांनंतर त्यांना तातडीने हॉस्पिटमध्ये हलवण्यात आलं होतं जिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. डॉक्टरांच्या माहितीनुसार ‘थलैवा’च्या प्रकृतीत  बरीच सुधारणा आहे. त्यांच्या चाचणी अहवालांमध्ये कोणतीही चिंतेची बाब नाही. तसेच, रजनीकांत यांना उच्च रक्तादाबाशिवाय इतर कोणताही त्रास नसल्याचे काल रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.