जळोची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी उपनेते पदी निवड केली आहे. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्याच अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया आधी जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. त्या अनुषंगाने बारामती येथून आज पक्ष वाढीसाठी सुरुवात करण्यात येत आहे.
आज शिंदे गटातील वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत. मूळ शिवसेनेतील काही पदाधिकारी आमच्या सोबत येण्यास तयार असतील त्यांनाही आम्ही सोबत घेणार आहोत. अशी माहिती माजी मंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
आज बारामतीमध्ये बाळासाहेबाचीं शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची बारामती दौऱ्याला सुरुवात झाली. यावेळी अँड गोविंद देवकाते उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी ,पुणे जिल्हा, शिवसेना शिंदे गटाचे नेते देवेंद्र बनकर, ज्येष्ठ नेते हनुमंतराव लकडे, दिगंबर पडकर, सुरेंद्र जेवरे,संदीप नवले, दत्ताभाऊ गावडे अनेक मान्यवरांनी बारामतीत भिगवन चौक येथे स्वागत करून दौऱ्याला सुरुवात केली..