#AFGvWI 3rd T20 : अफगाणिस्तानचे विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान

लखनौ : अफगाणिस्तान विरूध्द विंडिज दरम्यान तिस-या आणि निर्णायक टी-२० क्रिकेट सामन्यात अफगाणिस्तानने रहमानुल्लाह गुरबाजच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विंडिजसमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले आहे. तीन टी-२० क्रिकेट सामन्याच्या मालिकेत विंडिजने पहिला तर अफगाणिस्ताने दुसरा सामना जिंकल्याने १-१ अशी बरोबरी झाली आहे.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १५६ धावा केल्या. अफगाणिस्तानची सुरूवात खराब झाली. सलामीवीर हजरत जजई(०), करीम जनत (२) आणि इब्राहिम जदरान (१) धावांवर बाद झाले. मात्र रहमानहुल्लाह गुरबाजने ५२ चेंडूत ७९ आणि असगर अफगान २४, मोहम्मद नबी १५, नजीबुल्लाह जादरानने १४ धावा करत संघाची धावसंख्या १५६ पर्यत नेली.

विंडिजकडून कीमो पाॅल, केसरिक विलियम्स, शेल्डन काॅटरेल यांनी प्रत्येकी २ तर कायरन पोलार्डने १ गडी बाद केला

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)