मुंबई – 13 व्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान संपन्न झाले. आता मतमोजणीला सुरुवात झाली असून, सर्वच उमेदवारांच्या मनात धाकधुक निर्माण झाली आहे. या निवडणूकीत कुणाला जनादेश मिळणार याबाबत अवघ्या महाराष्ट्रात उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, वरळी विधानसभा मतदारसंघातून युवा सेना प्रमुख ‘आदित्य ठाकरे’ ६३ हजार ६७२ मतांनी विजयी झाले आहेत. ठाकरे कुटुंबातून निवडणूक लढणाऱ्या आदित्य ठाकरेंनी विजय मिळवत मोठा इतिहास रचला आहे.
We would like to thank everyone who has extended their support to Yuvasena President Aaditya Thackeray. pic.twitter.com/OcdW7WkEqB
— Shivsena Communication (@ShivsenaComms) October 19, 2019