मुंबई: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज विधिमंडळात आमदारकीची शपथ घेतली. आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराचा भार आपल्या खांद्यावर घेतला होता. त्यांनी आदित्य संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभर दौरा केला. आदित्य ठाकरे हे वरळी मतदार संघाचे आमदार आहेत. तसेच ते ठाकरे घराण्यातील पहिलेच आमदार ठरले आहेत.