मुंबई : विधानभवनात आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. ज्येष्ठ, अनुभवी आमदारांसोबत यावेळी युवा आमदारांनी देखील शपथ घेतली. यामध्ये कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांचा देखील समावेश होता. या शपथविधी सोहळ्यात सगळ्यांनी एकाच पद्धतीने शपथ घेतली मात्र रोहित पवारांनी अनोख्या अंदाजात शपथ घेतली.
शपथ घेताना सर्व आमदारांनी आपलं नाव-वडिलांच नाव- आडनाव यापद्धतीने सुरूवात केली. मात्र रोहित पवारांनी आपलं नाव ‘मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार …’ असं घेतलं. शपथविधी सुरू होताच रोहित पवारांनी जी सुरूवात केली त्यामुळे सभागृहातील सगळ्यांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्या. रोहित पवारांनी आपल्या आईच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे आपलं वेगळपण अधोरेखित केलं आहे. आपल्या नावात आईच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी त्यांची आई सुनंदा पवार यांची कृतज्ञता व्यक्त केली आहे
Thank You @supriya_sule Aatya for your wishes ? https://t.co/TpRW0jO2Wu
— Rohit Rajendra Pawar (@RohitPawarSpeak) November 27, 2019
दरम्यान, या सोहळ्याला रोहित पवार यांची पत्नी कुंती पवार देखील उपस्थित होत्या.