आरेला हात लावला तर सहन करणार नाही- आदित्य ठाकरे

मुंबई- अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या बांधकामात अडथळा ठरणारी 2,238 झाडे अखेर कापण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पासाठी सर्वच स्तरातून विरोध दर्शवला जात आहे. दरम्यान, युवासेना प्रमुख ‘आदित्य ठाकरे’ यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेनेचा मेट्रोला विरोध नसून आरे कारशेडमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कारशेडला विरोध असल्याचं त्यांनी म्हंटल.

यावेळी आदित्य यांच्या सोबत तज्ञ् देखील उपस्थित होते. त्यांनी सादरीकरण करत आरेचे महत्त्व पटवून दिले. तिथे सापडलेल्या वन्यजीवांचे फोटो, व्हिडीओ दाखवत आदित्य ठाकरे यांनी मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाचा दावा फेटाळून लावला.

आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘आम्ही सगळे मुंबईसाठी बसलेले आहोत. मेट्रो आम्हाला सगळ्यांना हवी आहे, पण ही जी काही दादागिरी चालू आहे, मनमानी सुरु आहे, सगळं काही आम्ही सहन केलं आहे, पण मुंबईत आरेला हात लावला तर आम्ही सहन करणार नाही.’

‘आम्ही फक्त विरोधासाठी विरोध करत नाही. पण मुंबईतून काहीतरी नष्ट होणार आहे आणि ते आम्हाला नको आहे. लोकांचा जो आवाज आहे तो सरकारने ऐकावा, हा फक्त झाडांचा प्रश्न नाही तर त्यापेक्षा आणखी काहीतरी आहे. इथल्या जैवविविधता, प्रजाती, पक्ष, कीटक आणि तिथे असलेल्या सगळ्या गोष्टींचा आहे.’ असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)