मुंबई – आयुष्मान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाचा मुहूर्त आज मुंबईत पार पडला आहे. धमाल कॉमेडी असलेला हा चित्रपट १३ मार्च २०२० ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
यावेळी चित्रपटाचा निर्माता भूषण कुमार, आनंद एल राय आणि आयुष्यमान खुराणा यांनी क्लॅप देऊन शूटींगला सुरूवात केली. ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटाला मिळालेल्या तुफान यशानंतर हा त्याचा दुसरा भाग आहे. आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांची जोडी पुन्हा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
#ShubhMangalZyadaSaavdhan begins… Release date finalized: 13 March 2020… Stars Ayushmann Khurrana… Directed by Hitesh Kewalya… Produced by Bhushan Kumar and Aanand L Rai. pic.twitter.com/J9VxDFQXN4
— taran adarsh (@taran_adarsh) September 10, 2019
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असेल. पहिल्या भागापेक्षा अधिक मनोरंजन यामध्ये होणार अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन हितेश केवल्या करणार आहेत.