महापालिका आयुक्‍तांचा पदभार अतिरिक्‍त आयुक्‍तांकडे

“इलेक्‍शन ड्युटी’मुळे  बदल : महत्त्वाच्या निर्णयांसाठी चर्चा करणार

पिंपरी – महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांची लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमध्ये निरीक्षकपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत प्रशासकीय कामकाजाचा खोळंबा होऊ नये, याकरिता अतिरिक्‍त आयुक्‍त संतोष पाटील यांच्याकडे या कालावधीतील पदभार सोपविण्यात आला आहे. आगामी वीस ते पंचवीस दिवस हा बदल राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची निरीक्षक पदांबरोबरच अन्य पदांवर नियुक्‍ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांची उत्तर प्रदेशात निरीक्षकपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. आजपासून (दि. 22) हर्डीकर मुख्यालयात उपलब्ध असणार नाही. त्यांच्या अनुपस्थितीत प्रशासकीय कामकाजाच्या त्यांच्या पदाची जबाबदारी अतिरिक्‍त आयुक्‍त संतोष पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

या कालावधीत सर्व विषयांबाबत प्राप्त होणारी कागदपत्रे व नस्त्यांपैकी तातडीच्या व महत्त्वाच्या नस्त्यांवर अतिरिक्‍त आयुक्‍त संतोष पाटील यांनी आयुक्‍त हर्डीकर यांच्याशी चर्चा करुन “आयुक्‍तांकरिता’ म्हणून स्वाक्षरी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या कालावधीत कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी पाटील यांना हर्डीकर यांच्याशी चर्चा करावी लागणार आहे. पाटील यांनी घेतलेले निर्णय आणि कार्यवाहीचा अहवाल हर्डीकर यांना सादर करावयाचा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.