ऍड अस्त्र – २१ व्या ‘मामि’ने दिलेलं जबरदस्त असं सरप्राईझ…

२०१९ रोजी संपणार आहे. यंदाच्या फेस्टिवल मध्ये आजच्या ५ व्य दिवसापर्यंत एकाच चित्रपटाची सर्वात जास्त चर्चा होतेय. तो चित्रपट म्हणजे ब्रॅड पिटची मुख्य भूमिका असणारा ‘ऍड अस्त्र’.

रविवारी २० ऑक्टोबर २०१९ रोजी कुलाबा येथील रिगल या थियेटर मध्ये मामि अंतर्गत ‘ऍड अस्त्र’ हा चित्रपट दाखवण्यात आला. या चित्रपटासाठी मुंबईकर सिनेप्रेमींनी चांगलीच गर्दी केली होती. थियेटर बाहेर खूप मोठी रांग लागली होती. खरं तर ब्रॅड पिट या एका नावामुळेच ही गर्दी झाली होती, हे वेगळं सांगायला नको.

‘ऍड अस्त्र’ हा एक सायन्स फिक्शन प्रकारातील सिनेमा आहे. आत्तापासून साधारण पन्नास वर्षानंतरचा काळ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. विज्ञानाने खुप प्रगती केलेली असून मानवाने चंद्रावर वस्ती केली आहे. तीस वर्षांपूर्वी एका अंतराळ मोहीमेवर गेलेल्या एका टीमशी नंतर कुणाचाच काही संपर्क झाला नव्हता. त्या मोहिमेचे प्रमुख क्लिफोर्ड मॅकब्राईड हे अंतराळात नेपच्यून या ग्रहावर एका ठिकाणी जिवंत असल्याची माहिती अंतराळ संशोधन करणाऱ्या संस्थेला मिळते. मॅकब्राईड यांचा मुलगा रॉय हा एक अनुभवी असा अंतराळवीर आहे , त्याच्या वडिलांना शोधून आणायची जबाबदारी अंतराळ संशोधन संस्था त्यालाच देते. रॉयने याआधी केलेल्या सर्व अंतराळ मोहिमांमध्ये सर्व आव्हानांना मागे टाकून यश प्राप्त केलेलं असते. त्यामुळे हे आव्हान तो स्वीकारतो. आधी पृथ्वीवरून चंद्र आणि तिथून नेपच्यून अशा प्रवासासाठी रॉय सज्ज होतो. पुढे तो नेपच्यूनवर पोहोचतो का ?, त्याची आणि त्याच्या वडिलांची भेट होते का ? तो सुखरूप या मोहिमेवरून परत येतो का ? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी हा चित्रपट थियेटर मध्ये जाऊनच बघावा लागेल.

ब्रॅड पिटने रॉय या अंतराळ वीराची भूमिका केली आहे. ब्रॅड पिट याचा जबरदस्त अभिनय हाच या चित्रपटाचा एक प्रमुख यूएसपी आहे. रॉय हे पात्र अगदी चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच आपल्याला गुंतवून घेतं. जसा जसा चित्रपट पुढे जातो तसं तसं आपण या चित्रपटाच्या कथेत पूर्णपणे गुंतून जातो. रॉय त्याच्या वडिलांना शोधण्यासाठी जे काही करतो ते पाहताना आपल्याला थोडंसं भावुक व्हायला होतं. तीस वर्षानंतर तो त्याच्या वडिलांना प्रत्यक्षात पाहणार असतो.

जेम्स ग्रे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून ते या चित्रपटाचे सहलेखक सुद्धा आहेत. सायन्स फिक्शन फिल्म मध्ये लेख विज्ञानामधील विविध अविष्कार आपल्याला दाखयतात. तसेच याही चित्रपटात लेखकाने अगदी कमाल केली आहे. चंद्रावरील मानवी वस्ती, चंद्रावरील लाँचिंग पॅड, अंतराळातील स्थानक, नेपच्यून ग्रह या सर्व गोष्टी पाहताना खूपच मजा येते. त्यामुळेच लेखकाच्या कल्पनाशक्तीला दाद द्यायलाच पाहिजे.

प्रत्येक वर्षीच्या फिल्म फेस्टिवल साठी एक तरी अशी फिल्म असते जी त्या फेस्टिवल साठी आपल्या सर्वांच्या विशेष अशी लक्षात राहते. २१ व्या मामि अर्थात मुंबई फिल्म फेस्टिवल साठी ‘ऍड अस्त्र’ ही ती फिल्म आहे. यंदाच्या मामिने ‘ऍड अस्त्र’ या चित्रपटाद्वारे दिलेलं जबरदस्त असं सरप्राईज इथून पुढे कायम लक्षात राहील, हे मात्र नक्की.

– अमोल कचरे 

Leave A Reply

Your email address will not be published.