मुंबई – मुंबई अकॅडमी ऑफ मोविंग इमेजेस अर्थात मामी फिल्म फेस्टिव्हलच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्माती प्रियंका चोप्रा जोनाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याविषयी एकमताने मांडलेल्या ठरावाला नीता अंबानी, आनंद महिंद्रा, फरहान अख्तर, रितेश देशमुख, आदी सदस्यांनी पाठिंबा दिला.
प्रियंका चोप्रा यांच्या नियुक्तीने या फिल्म फेस्टिव्हलची लोकप्रियता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.
अनेक हिंदी चित्रपटांमधून आपल्या विविध भूमिकांद्वारे आपल्या अभिनयाची छाप सोडलेली प्रियांका चोप्रा जोनाज ही राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री आहे.
सध्या ती हॉलीवूडमध्ये फिरवली असली तरी हिंदी सिनेसृष्टी शी तिचा चांगला संपर्क आहे. मामी फिल्म फेस्टिव्हलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने आपल्याला विशेष आनंद होत असून आगामी वर्षात अनेक वेगळे उपक्रम राबवण्याचा मनोदय प्रियंका चोप्रा यांनी जाहीर केला आहे