मुंबई – खरेदी करण्यासाठी तुम्ही ज्या पैशांचा वापर करता त्या नोटांवरही गांधीजींचाच फोटो आहे. तुम्ही कितीही विरोध केला तरी देशात आणि परदेशात जेथे भारताबद्दल बोललं जाईल तेथे गांधीचं आहेत. इच्छा नसली..विरोध असला तरी डोकं टेकावंच लागतं, नाही का? हेच गांधीजी आहेत!! सत्यमेव जयते..बापूंना नमन.. म्हणत अभिनेत्री रिचा चड्डाने आपल्या पोस्टच्या माध्यमातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.
देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 वी जयंतीनिमित्त बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही त्यांच्या गांधींजींचे सुविचार आदी बाबी शेअर केल्या आहे. यामध्ये सध्या अभिनेत्री रिचा चड्डाची पोस्ट व्हायरल झाली आहे.
कितने भी तुम trend ख़रीदो,
जिस पैसे से ख़रीदोगे उसपे गांधी की ही फ़ोटो है! 😂
कितनी भी तुम गाली दे दो,
देश, विदेश जहाँ भारत की बात हो, वहाँ गांधी ही है… जहाँ ना भी हो, वहाँ भी गांधी है।
मन मार के ही सही, माथा टेकना तो पड़ता है न? यही गांधी है!
सत्यमेव जयते 🏹
बापू को नमन।— TheRichaChadha (@RichaChadha) October 2, 2020
दरम्यान, उत्तरप्रदेशातील हाथरस प्रकरणाचे पडसाद देशात उमटले आहे१२`. त्या प्रकरणाचा आणि प्रकरणाच्या हाताळणीवरून उत्तरप्रदेश सरकारचा निषेध विरोधकांकडून केला जात आहे . या प्रकरणाची हाताळणी उत्तरप्रदेश सरकार आणि पोलीस चुकीच्या पद्धतीने करत आहेत. त्या राज्यात गुंडाराज सुरू आहे, असा आरोप केले जात आहे.