मुंबई – भांडण, प्रेम, द्वेष आणि स्पर्धा या सगळ्यांचं मिश्रण असलेला सर्वांचा लाडका रिएलिटी शो पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. आणि तो शो आहे. अभिनेता सलमान खानचा “बिग बॉस” लवकरच ‘बिग बॉस 14’ सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही चाहते या शोसाठी खूप उत्साहित आहे.
दरम्यान, बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये कोणते कलाकार झळकणार? याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती म्हणजे, सुखविंदर कौर अर्थातच ‘राधे माँ’ यांची. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दिलेल्या माहिती नुसार राधे माँ यांच्याकडे या सीझनमधील सर्वाधिक मानधन घेणारी म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. प्रत्येक आठवड्यात राधे माँला 75 लाख रुपये दिले जाण्याचा दावा केला जात आहे.
बिग बॉस 13 म्हणजे मागील सीझनसाठी देखील राधे माँ यांना विचारले होते. पण काही कारणांमुळे त्यांनी नकार दिला होता. दरम्यान, बिग बॉस 13 चा विजेता “सिद्धार्थ शुक्ला’ही सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकांपैकी एक होता. तो प्रत्येक आठवड्याला 9 लाख रुपयांचं मानधन घ्यायचा.