मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूरला करोनाची लागण झाली आहे. यामुळे तिने स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले होते. सध्या ती क्वारंटाइन असल्याने तिला मुलांची आणि नवऱ्याची म्हणजेच सैफ अली खानची आठवण येत आहे.
करिना अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच करिनाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्या स्टोरीतून तिला तिच्या कुटुंबीयांची आठवण येत असल्याचे दिसून येते.
यासोबत करिनाने सैफ अलीचा एक फोटोही चाहत्यांशी शेअर केला आहे. या फोटोत सैफ अली खान हा लाल रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे. दरम्यान, करिना कपूर आणि अमृता अरोरा यांना करोनाची लागण झाली आहे. या अभिनेत्रींनी अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती.
त्यामुळे या अभिनेत्रींना करोनाची लागण झाल्याचे बोलले जात आहे. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास करिना लवकर “लाल सिंह चढ्ढा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज करण्यात येणार आहे. यात करीनासह अभिनेता आमीर खान हा मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे.