मुंबई – अभिनेता विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. आज दीनानानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबतची माहिती देत त्यांची तब्येत खालावली असल्याचे म्हंटले गेल्या काही दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शिरीष याडगीकर म्हणाले, “ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत.त्यांची प्रकृती थोडी खालावली आहे. त्यांचा रक्तदाब सुरळीत ठेवण्यासाठी औषधे चालू आहेत.” विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत रोज रुग्णालयाकडून माहिती दिले जात आहे.