मुंबई – जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं काल पुण्यातील रुग्णालयात निधन झालं. काल सायंकाळी पुण्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विक्रम गोखले यांच्या जाण्याने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीचे देखील कधीही न भरून निघणारे असे मोठे नुकसान झाले आहे. विक्रम गोखले यांनी अनेक अजरामर चित्रपटांमध्ये काम केलं. त्यातीलच एक म्हणजे नटसम्राट. त्यांच्या जाण्यानंतर नटसम्राटमधील एक सिन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
नटसम्राट या चित्रपटासाठी विक्रम गोखले यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा मराठी फिल्मफेअर पुरस्कार देखील देण्यात आला. नाना पाटेकर यांच्यासोबत दिलदार मित्राची भूमिका साकारणाऱ्या विक्रम गोखलेंनी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना अक्षरशः रडवल होत. नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्यातील कर्ण आणि श्रीकृष्णाचा संवाद असलेला रुग्णालयातही तो सिन खूपच व्हायरल होतोय.
RIP Vikram Gokhle 💐
This scene from natsamrat, will always iconic.#vikramgokhale pic.twitter.com/Lawt5fkhoa— Yogesh (@Nifty4500) November 26, 2022
विक्रम गोखले आज आपल्यात नसले तरी त्यांच्या बहुगुणी अभिनयाची छाप नेहमीच आपल्यात राहिली असं म्हणत अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. विक्रम गोखले आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणं कठीण जात असल्याचे एका युजरने लिहिले आहे तर दुसऱ्याने असा अभिनेता होणार नाही असं म्हंटल आहे.