मुंबई – जवळपास दोन वर्षांपूर्वी प्रचंड मोठं वादळ उठलेल्या अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा अद्याप पूर्ण छडा लागलेला नाही. सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा त्रास संपण्याचे नाव घेत नाहीये. रिया अजूनही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या रडारखाली आहे. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी आरोपांचा मसुदा तयार केला आहे. ज्यामध्ये रिया आणि इतर 34 आरोपींवर उच्च समाज आणि बॉलिवूडमधील लोकांना ड्रग्ज पुरवल्याचा आरोप आहे. सुशांतला ड्रग्जच्या आहारी जाण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोपही आहे.
एनसीबीचा आरोप आहे की, रियाने सुशांत सिंग राजपूतसाठी ड्रग्स विकत घेतले आणि त्यासाठी पैसे दिले. या प्रकरणातील 35 आरोपींवर एकूण 38 आरोप आहेत. एनसीबीने आपल्या चार्ज ड्राफ्टमध्ये दावा केला आहे की, रियाने सॅम्युअल मिरांडा, शोविक चक्रवर्ती, दीपेश सावंत आणि इतरांकडून अनेक वेळा गांजा घेतला. गांजाची डिलिव्हरी घेतल्यानंतर रियाने तो दिवंगत सुशांत सिंग राजपूतला दिला.
रियाने मार्च ते सप्टेंबर 2020 या कालावधीत गांजाच्या या वितरणासाठी पैसे दिले. या प्रकरणातील सर्व 35 आरोपींवर आरोप ठेवण्यात आलेल्या मसुद्यानुसार, ते सर्वजण मार्च ते डिसेंबर 2020 या कालावधीत गुन्हेगारी कटात सहभागी झाले होते. यावेळी, अमली पदार्थांची खरेदी-विक्री, शहरांतर्गत वाहतूक, एकमेकांसोबत किंवा गटांमध्ये, बॉलीवूडसह उच्च समाजातील लोकांनाही वाटप केले.
शिवसेनेची भूमिका अनाकलनीय; कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आश्चर्य
सुशांत सिंग राजपूत 14 जून 2020 रोजी त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला होता. सुशांतच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देशाला धक्का बसला. सुशांत प्रकरणाचा तपास अनेक तपास यंत्रणांनी केला आहे, मात्र मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सुशांतचे चाहते आजही त्याला न्याय मिळावा अशी याचना करत आहेत.
आर्यन खानला सत्र न्यायालयाचा दिलासा; पासपोर्ट परत देण्याचे एनसीबीला निर्देश