मुंबई – क्रूझ ड्रग्स प्रकरणी क्लीन चिट मिळालेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला मुंबई सत्र न्यायालयानेही मोठा दिलासा दिला आहे. एनसीबीने जप्त केलेला पासपोर्ट आर्यन खानला परत देण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत.
आर्यन खानने 30 जून रोजी विशेष एनडीपीएस न्यायालयात आपला पासपोर्ट परत मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाने एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 13 जुलैची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार आता आर्यन खानला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे.
भारत जोडो संदर्भात कॉंग्रेसची गुरुवारी बैठक
कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. मात्र एसआयटीने दाखल केलेल्या आरोपपत्रात नाव वगळण्यात आल्याने आर्यनला क्लीन चीट मिळाली होती. या प्रकरणातील तपासाशी आता कोणताच संबंध नसल्याने आर्यनला त्याचा पासपोर्ट परत करण्याचे एनसीबीला निर्देश देण्यात आले आहे.
मुंबई महापालिका निवडणूक; शरद पवार यांचे कार्यकर्त्यांना कामाला लागाचे निर्देश…