पिंपरी -मुंबई-बेंगळुरू महामार्गावर पाषाण येथे गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकने जीपला मागून धडक दिली. धडक बसलेल्या जीप चालकाने नियंत्रण सुटले आणि जीपने एका पादचाऱ्याला धडक दिली.
यात पादचाऱ्याच्या मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 20) रात्री घडला. महिपाल भगीरथराम बिष्णोई (वय 25, रा. जोधपूर, राजस्थान), कांचन भट (वय 41) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक सचिन बेबले यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मृत्यू झालेल्या पादचाऱ्याची अद्याप ओळख पटली नाही.