कापूरहोळ – पुणे-सातारा महामार्गावर भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपासमोर निगडे (ता. भोर) येथे साता-याकडून पुण्याकडे जाणाऱ्या कारचा आज (दि. ८ ) दुपारी दोन वाजता अपघात झाला असून, यात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे समजते.
या अपघातातील कारचालक अनिल उद्धव सूर्यवंशी (रा. परांजपे कॉलनी, पलूस, सांगली) यांस सिद्धिविनायक हॉस्पिटल, नसरापूर येथे उपचाराकरिता नेण्यात आले असता कारचालक मृत झाल्याचे सांगण्यात आले.
हा अपघात हा कार (एमएच १४ एफ एक्स ३०१०) चालवताना चालकास हृदयविकराचा तीव्र झटका आल्याने झाला असल्याचे समजत आहे. घटनेची माहिती राजगड पोलिसांना समजताच राजगड पोलीस घटनस्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.