राजहंस दूध संघातर्फे दूध उत्पादकांचा अपघातीविमा

संगमनेर – संगमनेर तालुका दूध संघाच्या माध्यमातून तालुक्‍यातील सर्व दूध उत्पादकांचा सपत्नीक एक लाख रुपयांचा अपघाती विमा काढण्यात येणार असल्याची माहिती राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिली. ते दूध संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

अध्यक्षस्थानी दूधगंगा पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे होते. यावेळी बाजीराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, शिवाजीराव थोरात, साहेबराव गडाख, नवनाथ आरगडे, दादा कुटे, भास्करराव शेरमाळे, प्रदीप शहा, अनिल देशमुख, मोहनराव करंजकर, जयवंतराव गुंजाळ, लहाणूभाऊ गुंजाळ, बाजीराव कुटे उपस्थित होते. देशमुख म्हणाले, सहकारी संस्थेच्या माध्यमातून सामान्यांच्या विकासासाठी सतत प्रयत्न केला जात आहे.

ग्रामीण भागासह शहरी भागातही पतसंस्था, दूध संस्थेचे मोठे जाळे निर्माण झाले असून, संस्थेच्या भांडवलात चांगली वाढ झाली आहे. तालुक्‍यातील दूध उत्पादकांचा सपत्नीक एक लाख रुपयांचा अपघाती विमा काढण्यासाठी लागणारे पती-पत्नीचे कागदपत्र त्वरित आपापल्या दूध संस्थेत जमा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)