भाजपाध्यक्ष अमित शहांनी एम्स रुग्णालयात केली स्वच्छता
एम्स रुग्णालयातील रुग्णांचीदेखील घेतली भेट
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त भाजपकडून सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमीत्त भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जावून तिथे स्वच्छता मोहिम राबवली. तसेच तिथल्या रुग्णांसोबत बातचीत करत रुग्णांना फळे वाटपदेखील केले. दरम्यान, अमित शहा यांच्या सोबत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डादेखील उपस्थित होते. तसेच केंद्रीय मंत्री विजय गोयल आणि दिल्लीचे आमदार विजेंद्र गुप्ता हेदेखील यावेळी उपस्थित होते.
Amit Shah, BJP President: BJP workers across the country will begin celebrating ‘seva saptah’ today. Our PM has dedicated his entire life to serve the nation & worked for the poor. So, it is appropriate that we celebrate his birthday week as ‘seva saptah’. https://t.co/RF51xVMVHb pic.twitter.com/A4lTQ4FTiT
— ANI (@ANI) September 14, 2019
येत्या 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून 14 ते 20 असा सात दिवसांचा सेवा सप्ताह आयोजित केला आहे. एम्स रुग्णालयात अमित शहा यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाची सेवा करण्यासाठी समर्पित केले आहे. तसेच गरीबांची सेवा करण्यासाठी मोदींनी आपले आयुष्य खर्च केले त्यामुळे पंतप्रधानांचा वाढदिवस हा सेवा सप्ताहाचे आयोजन करून करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.