मुंबई – बॉलिवूडचे महानायक म्हणजेच, अभिनेते ‘अमिताभ बच्चन’ यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अमिताभ यांनी स्वत:च कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली. त्यानंतर अमिताभ बच्चन सह अभिषेक बच्चन यांना सोशल मीडियावर चांगलेच युजर्सद्वारे ट्रोल करण्यात आले.
दरम्यान, अभिषेकला ट्विटरवर युजर्सने प्रश्न केला, ‘तुझे वडिल अमिताभ बच्चन रुग्णालयात आहेत. आता तू तुझं पोट कसं भरणार?’ त्यावर अभिषेकने त्या ट्रोलरला चांगलेच सडेतोड उत्तर दिले. त्यावर अभिषेकने ‘सध्या तरी आम्ही दोघे रुग्णालयात झोपून खात आहोत’ असे उत्तर दिले. अभिषेकने दिलेल्या या उत्तराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
तत्पूर्वी, सोशल मीडियावरून युजर्सद्वारे ट्रोल करण्यात आल्यावर बिग बी ने सुद्धा संताप व्यक्त केला होता.