शिरूर -येथील सुरेश भिमराव वाघचौरे (वय 55) यांचा चक्कर आल्यामुळे मृत्यू झाला आहे. याबाबत मयताचा मुलगा विशाल वाघचौरे याने शिरूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. बुधवारी (दि. 29) सकाळी 7 वाजता सुरेश वाकचौरे यांनी मुलगा विशाल यास फोन करून मला चक्कर आली असून मी निर्माण प्लाझा येथे बसलो आहे, असे सांगितले.
त्यानंतर विशाल याने वडिलांना खासगी हॉस्पिटल येथे नेले परंतु तेथे जागा शिल्लक नसल्याने नगर येथे रुग्णालयात घेऊन जात असताना बेलवंडी फाटा येथे त्यांना जास्त त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना शिरूर ग्रामीण रुग्णालयात आणले मात्र तेथे उपचारा अगोदरच सुरेश वाकचौरे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.