अभिषेक बच्चनही करोनातून बाहेर

मुंबई – बच्चन कुटुंबातील अभिनेता अभिषेक बच्चनही आता करोनातून बाहेर आला आहे. ते पूर्ण बरे झाले आहेत अशी माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे. स्वताः अभिषेक बच्चन यांनीही आपल्या ट्विटरवर याची माहिती दिली असून त्यांनी आपण करोनाला हरवणारच होतो, त्यानुसार मी आजच करोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे असे त्यांनी ट्विटरवर नमूद केले आहे.

आपल्या कुटुंबीयांसह रुग्णालयाचे वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्‍टरांचेही त्यांनी आभार मानले आहेत. बच्चन कुटुंबातील एकूण चार जणांना करोनाची बाधा झाली होती. त्यातील तीन जण या आधीच रिकव्हर होऊन घरी गेले आहेत. आज अभिषेक बच्चन हेही यातून बरे झाले आहेत. महानायक अमिताभ बच्चन हे 2 ऑगस्टला या आजारातून बरे होऊन घरी गेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.