मुंबई – कला, साहित्य आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणारे “अभिजित बिचुकले” त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा बिग बॉस फेम बिचकुले चर्चेत आले आहेत.
अभिजित बिचुकले यांनी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी राष्ट्रपतीपदाची निवडणूक असेल किंवा लोकसभा, विधानसभेची निवडणूक असेल यामध्येही त्यांनी आपलं नशीब आजमावलं होतं. मात्र, नेहमीच त्यांच्या वाटेल अपयश आलं आहे.
राज्यातील 5 पदवीधर मतदारसंघांसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आता आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. तर 3 डिसेंबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
याच पार्श्ववभूमीवर बिचकुले म्हणाले कि, “माझा चाहतावर्ग मला कायमच पाठिंबा देत असतो. परंतु पैसा आणि सत्तेच्या ताकदीसमोर माझी चिकाटी कमी पडते. त्यामुळेच आपला पराभव होत आला आहे. परंतु पदवीधरच्या निवडणुकीत मतदारांनी गांभीर्यानं विचार केला पाहिजे. मी शिक्षण आणि नोकऱ्यांना प्राधान्य देणार आहे. मला एकदा संधी देऊन पाहावी”. असं बिचुकले यांनी म्हंटल आहे.