लोणी : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामध्ये अभाविप कार्यकर्ते व सामान्य विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ लोणी येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी अभाविप कार्यालयांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधातही निषेध नोंदवण्यात आले. यावेळी अभाविपचे महानगर सहमंत्री प्रसाद आठवले , योगेश्वर राजपुरोहित, सोहम मोटे, शुभम वारे, शुभम वाकडे व कॅम्पस मधील विद्यार्थी उपस्थित होते.