जळोची: शिंदे गटाचे नेते व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सत्तार यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद बारामतीत उमटले असून सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली.
बारामती शहरातील भिगवन चौक येथे राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्रित येत खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्य वक्तव्य केल्याप्रकरणी जोरदार निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी विशेषतः महिला कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांनी सत्तार यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली….नीम का पत्ता कडवा..हे..अब्दुल सत्तार…पन्नास खोके..ओके…अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या.
अब्दुल सत्तार यांनी “इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ”, असं म्हटलं. यानंतर पुन्हा एकदा सत्तार यांनी “ते आम्हाला खोके बोलू लागले आहेत, आमचे खोके त्यांचे डोके तपासावे लागेल, ज्यांचे डोके तपासावे लागेल खोक्याची आठवण येऊ लागली आहे त्यांच्यासाठी सिल्लोडमध्ये दवाखाना उघडावा लागेल. त्या दवाखान्यात खोके खोके बोलतात त्यांचे डोके तपासावे लागले. हे भिकारXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही दररोज लोकसभा, विधानसभेसाठी मतांची भीक मागतो”, असे अब्दुल सत्तार म्हणाले.