Abdul Sattar Viral Video – डीजे डान्सर गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात राडा अन् राजकीय नेत्यांची शिवराळ भाषा महाराष्ट्रातील जनतेला आता काही नावीन राहिली नाही. असाच प्रकार बुधवारी सिल्लोड येथे पाहायला मिळाला. निमित्त ठरलं शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाचं.
सत्तार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिल्लोड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी येथे गौतमी पाटील हिच्या डीजे डान्सचा कार्यक्रम होता. कार्यक्रम सुरु असताना पुढे बसलेल्या काही तरुणांनी हुल्लडबाजी करण्यास सुरुवात केली. हे पाहून मंत्री सत्तार भलतेच संतापले.
आवाहन केल्यानंतरही तरुणांनी हुल्लडबाजी करणं न थांबवल्याने अखेर मंत्रीमहोदय खुद्द स्टेजवर आले. माईक हातात घेत त्यांनी तरुणांना बदडून काढा, जेलमध्ये टाका असे आदेशच पोलिसांना दिले.
मंत्रीमहोदयांच्या आदेशानंतर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या तत्परता दाखवत समोरच्या रांगेतील दिसेल त्याच्यावर लाठीचार्च केला. यावेळी सत्तार, एक हजार पोलीस बंदोबस्तासाठी असताना ५० हजार लोकांना मारायला काय लागते असं धक्कादायक वक्तव्य करत असल्याचेही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.
सत्तार यांनी यावेळी माईक हातातघेऊन बोलताना, ‘गोंधळ घालणाऱ्या या लोकांना कुत्र्यासारखं मारा’ असं म्हणताना देखील दिसतायेत.
महायुती सरकारची हीच संस्कृती हीच भाषा !
मंत्री अब्दुल सत्तारांचे आभार मानतो जे त्यांनी महायुती सरकारचा खरा चेहरा स्वतः जनतेसमोर आणला.
हजारोंच्या गर्दी सामोर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढायची भाषा वापरतात. महाराष्ट्र पोलीस दलातील जवानांना हे… pic.twitter.com/TFIO9WOgRi
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 4, 2024
विरोधकांचा निशाणा
अब्दुल सत्तर यांच्या शिवराळ भाषेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्तार यांच्यावर चांगलच तोंडसुख घेतलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत भाष्य करताना, “महायुती सरकारची हीच संस्कृती हीच भाषा… मंत्री अब्दुल सत्तारांचे आभार मानतो जे त्यांनी महायुती सरकारचा खरा चेहरा स्वतः जनतेसमोर आणला.
“हजारोंच्या गर्दी सामोर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढायची भाषा वापरतात. महाराष्ट्र पोलीस दलातील जवानांना हे महायुतीतील मंत्री स्वतःच्या टोळीतील “गुंड” समजतात का?…सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनाच्या नावाखाली कार्यक्रम घेऊन उपस्थितांच्या आई बापांवर अश्लील भाषेत टिपणी करत हजारो माता भगिनींना मान शरमेनं खाली घालायला लावणारे हे कसले मंत्री आणि हे कोणते प्रबोधनात्मक कार्यक्रम?” अशी पोस्ट केली आहे.
महायुती सरकारची हीच संस्कृती हीच भाषा !
मंत्री अब्दुल सत्तारांचे आभार मानतो जे त्यांनी महायुती सरकारचा खरा चेहरा स्वतः जनतेसमोर आणला.
हजारोंच्या गर्दी सामोर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढायची भाषा वापरतात. महाराष्ट्र पोलीस दलातील जवानांना हे… pic.twitter.com/TFIO9WOgRi
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 4, 2024
राजकीय नेत्यांचा शिवराळ शब्दकोश
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील राजकारणाचा पोत चांगलाच घसरला आहे. सकाळ सकाळ पत्रकार परिषदेत घेत शिवराळ भाषेत वक्तव्य करणाऱ्या आणि त्याच भाषेत उत्तर देणाऱ्या राजकीय नेत्यांची सध्या चलती असल्याचं दिसतंय. सत्ताधारी व विरोधी पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी वरकरणी जरी, आपल्या पक्षातील वाचाळवीरांना आवरण्याची भाषा करत असले तरी अशा नेत्यांना खुली सुटच मिळाली असल्याचं अशा वक्तव्यांमधून अधोरेखित होत आहे.