अहमदनगर : ग्रामदैवत विशाल गणपतीची मिरवणुकीचे चितळे रोडवर आगमन झाले आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते विशाल गणपतीची आरती करण्यात आली. दरम्यान, मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली आहे. दरम्यान, मुख्य मिरवणुकीतील पहिला गणपती जुन्या कापड बाजारातच बराच वेळ होता.
तसेच चितळे रोडवर विशाल गणपतीची मिरवणूकीत महिला भगिनींनी श्रींच्या गाण्यांवर नृत्यरचना सादर केली.