नवी दिल्ली – बांधकाम मजुरांच्या कल्याणाच्या नावाखाली दिल्लीत अनेक बनावट लाभार्थी पुढे करण्यात आले. त्यातून आप सरकारने कोट्यवधी रूपये लाटले. आपने दिल्लीत लालू मॉडेल नव्या अवतारात लागू केले आहे, असे टीकास्त्र केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी शनिवारी सोडले.
करोना संकटामुळे देशात काही काळ लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यावेळी दिल्लीतील बांधकाम मजुरांना दिलासा देण्यासाठी आप सरकारने प्रत्येकी 5 हजार रूपयांची मदत दिली. त्या मदत योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केला.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी चारा घोटाळा केला. तशाच प्रकारे दिल्लीत बांधकाम मजूर कल्याणाच्या नावाखाली घोटाळा झाला. मोठ्या संख्येने बनावट लाभार्थ्यांच्या नावे पैशांचे वाटप झाले. बांधकाम मजूर म्हणून टॅक्सी चालक, कचोरी विक्रेत्यांचीही नोंदणी करण्यात आली आहे.
Accident News : यवतमाळमध्ये एसटी-कारचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू
उत्तरप्रदेश, हरियाणात राहणाऱ्या अनेकांचा बांधकाम मजुरांच्या यादीत समावेश आहे, अशा आरोपांची सरबत्ती त्यांनी केली. बांधकाम मजुरांच्या कल्याणासाठीचा निधी नेमका कुणी लाटला, असा सवाल करत त्यांनी आपला घेरण्याचा प्रयत्न केला.