मुंबई – बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख कायम करणाऱ्या अभिनेता आमीर खान याच्यासाठी आजचा दिवस मोठा दिलासा देणारा ठरला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल आमिरने आपल्या घरामध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्याच्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे दिली होती. हे कर्मचारी आमिरच्या घरामध्ये काम करणारे असल्याने त्यांच्याकडून आमिरच्या कुटुंबीयांपैकी कोणाला कोरोनाचा संसर्ग झाला असेल काय? अशी चिंता व्यक्त करण्यात येत होती.
— Aamir Khan (@aamir_khan) June 30, 2020
अशातच काल आमिरने एक पत्रक जाहीर करत आपल्या कुटुंबातील सर्वांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत मात्र आपल्या आईची कोरोना टेस्ट होणे बाकी असून ती उद्या करण्यात येईल असे सांगितले होते. सोबतच त्याने आपल्या आईसाठी सर्वांनी प्रार्थना करावी असेही म्हंटले होते.
Hello everyone, I am most relieved to inform everyone that Ammi is Covid 19 negative.
Thank you everyone for your prayers and good wishes 🙏
Love.
a.— Aamir Khan (@aamir_khan) July 1, 2020
दरम्यान, आमिरच्या आईचा कोरोना अहवाल प्राप्त झाला असून त्याची आई झीनत हुसेन यांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत स्वतः आमिर खानने माहिती दिली असून आपल्या आईच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच आजचा दिवस मोठा दिलासा देणारा ठरला अशी भावनाही त्याने व्यक्त केली आहे.