मुंबई – भारतामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. अशा परिस्थितीत सगळ्याच कंपन्या बंद आहेत. त्यामुळे कलाक्षेत्रात काम करणाऱ्या विविध कामगारांसमोर सुद्धा मोठे आव्हान उभे राहिले आहे. यासाठी अनेक कलाकार पुढे आले आहेत.
Guys, I am not the person putting money in wheat bags. Its either a fake story completely, or Robin Hood doesn’t want to reveal himself!
Stay safe.
Love.
a.— Aamir Khan (@aamir_khan) May 4, 2020
अशातच मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसंबंधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत आमिर खानने पिठाच्या पिशवीतून १५ हजार रुपये वाटल्याचा दावा कऱण्यात आला होता. यानंतर सोशल मीडियावर आमिर खानची चर्चा सुरु झाली होती. पण आमिर खानने खरंच मदत केली आहे की ही अफवा आहे याबाबत मात्र उलट सुलट चर्चा सुरु होत्या. पण आता आमिर खानने स्वत: ट्विट करुन यासंबंधी खुलासा केला आहे. आमिर खानने ट्विट करत सांगितले की, ‘ती व्यक्ती आपण नाही, पिठाच्या पिशवीत पैसे टाकणारी व्यक्ती असणारा व्हिडियो पूर्णपणे खोटा आहे. किंवा दुसरा कोणीतरी रॉबिनहूड असावा ज्याला आपली ओळख जाहीर करण्याची इच्छा नाही असंही म्हटलं आहे. सुरक्षित राहा”.