मुंबई – बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सध्या आमिरने काही दिवसांपासून आपल्या शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे. या ब्रेकमध्ये तो अमृतसरच्या गोल्डन टेंपल येथे गेला. स्वर्ण मंदिरामधून त्याचे काही फोटो समोर आले आहे. सुपरस्टार आमिर खानच्या या फोटोला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.
Actor Aamir Khan offers prayers at Gurudwara Harmandir Sahib (Golden Temple) in Amritsar. He is in Punjab for shooting of his upcoming film #LalSinghChaddha pic.twitter.com/jyZMW6LzWQ
— ANI (@ANI) November 30, 2019
दरम्यान, या चित्रपटात अभिनेत्री करिना कपूर देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अमृतसरच्या गोल्डन टेंपल येथे आमिर खानसह बेबोही स्वर्ण मंदिरामधून फोटो समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर या दोघांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी, या चित्रपटातील त्या दोघांचा लूक पहिल्यांदाच समोर आला होता.
Kya pata hum mein hai kahani,
ya hai kahaani mein hum… pic.twitter.com/mDMA21J51z— Aamir Khan (@aamir_khan) November 6, 2019
या चित्रपटामध्ये आमिर खान डोक्यावर पगडी आणि लांब दाढीच्या सरदारच्या लूकमध्ये अगदी ठासून दिसतोय. अमिरच्या या फोटोला त्याच्या फॅन्सकडून चांगलीच पसंती मिळतेय. तर दुसरीकडे करिना कपूरचा लूकही समोर आला आहे. या फोटोमध्ये ती एका साध्या मुलीच्या रूपात दिसून येतेय. करिना आणि आमिर ‘थ्री इडियट्स’ नंतर बऱ्याच वर्षांनी स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.