सुनील शेट्टीचा मुलगा आहन शेट्टी लवकरच हिंद चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. मिलन ल्युथ्रियाच्या “तडप’ या आगामी सिनेमातून तो पदार्पण करणार आहे. 2018 साली तेलगूमध्ये सुपरहिट झालेल्या “आरएक्स 100’चा हा हिंदी रिमेक असणार आहे.
मूळ तेलगू सिनेमात कार्तिकेय गुमाकोंडा आणि पायल हे लीड रोलमध्ये होते. मात्र, “तडप’ थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वी आहनला आणखीन एक महत्त्वाचा सिनेमा मिळाला आहे, असे समजते आहे. आहन शेट्टीला “आशिकी 3’मधील लीड रोल मिळाला आहे, असे समजते आहे.
“तडप’मधून आहनला लॉंच केले जाण्यासाठीची धावपळ बघितल्यावर भूषण कुमार जबरदस्त इम्प्रेस झाला आहे. त्यामुळेच भूषण कुमारने आहनला “आशिकी 3’च्या लीड रोलची ऑफर दिली आहे. आहनची निवड जरी निश्चित झाली असली तरी अद्याप हिरॉईनची निवड झालेली नाही. “आशिकी’ रिफ्रॅंचायजीला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
1990 साली राहुल रॉय आणि अनू अगरवालच्या पहिल्या भागाने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती, तर 2013 सालच्या आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूरच्या दुसऱ्या भागालाही चांगली प्रसिद्धी मिळाली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता तिसऱ्या भागात होण्याची अपेक्षा आहे.