आधारमधील माहिती सुरक्षित – निलेकणी

बंगळुरू -आधार ही गुंतागुंत नसलेली अत्यंत साधी आणि कोणतीही माहिती गोळा न करणारी यंत्रणा आहे. आधार हे केवळ ओळखपत्र आहे. त्याचा वापर टेहळणीसाठी किंवा खासगी गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी करता येणार नाही, असे इन्फोसिसचे माजी सहसंस्थापक आणि आधारचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी स्पष्ट केले आहे.

इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ऍण्ड इडस्ट्रीजच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आधारचा वापर करून कोणत्याही प्रकारची माहिती गोळा केली जाऊ शकत नाही. प्रायव्हसीचा मुद्दाही आधारही जोडून पाहता येणार नाही. व्यक्तिगत पातळीवर सर्वसामान्यांना त्याचा फटका बसत नाही. प्रायव्हसीचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होतो, असे निलेकणी यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.