साताऱ्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

सातारा लोकसभा मतदार संघाची राज्यभर सुरू असलेली चर्चा अन्‌ झालेली हाय होल्टेज लढत यामुळे निकालादरम्यान शांतता राखण्यासाठी पोलिसांनी विविध प्रयोग केले आहेत. निकाला दिवशी पूर्ण क्षमतेने पोलीसबळ वापरता यावे म्हणून जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

सातारा  –सातारा व माढा लोकसभा मतदारसंघाच्या निकालादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये सातारा पोलीस दलाच्या साडे तीन हजार पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यासंह केंद्रीय व राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, गृहरक्षक दलाचे जवान तसेच अधिकारी, कर्मचारी असा तगडा पोलीस बंदोबस्त निकालादरम्यानमत मोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडून कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी कंबर कसली आहे. मतदानानंतर ते मतमोजणी दरम्यान पोलीस दलाच्या वतीने संवेदनशील, अतिसंवेदनशील गावांची माहिती गोळा करून त्या ठिकाणी शांतता राखण्यासाठी मास्टर प्लॅन आखला आहे. त्यानुसारच निवडणूक

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.